आपल्याच मनाची आपल्याच बरोबर सभा भरवावी,
आपण केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी आपणच आपली पाठ थोपटावी,
कळत - नकळत घडलेल्या चुकांसाठी मनोमन क्षमा मागावी ,
आपल्याच मनाची आपल्याच बरोबर सभा भरवावी.
विसरलेल्या गोष्टींची रीतसर यादी करावी,
पुन्हा न विसरण्याची तंबी ही द्यावी.
सुखांच्या क्षणांची उजळणी व्हावी,
दुःखाच्या क्षणांची वजाबाकी व्हावी,
आपल्याच मनाची आपल्याच बरोबर सभा भरवावी.
संध्याकाळच्या कातरवेळेची हुरहुर उरी जपावी,
देवघरातील देवापुढे मंद ज्योत पेटवावी.
क्लान्त शरीराने गादीवर पाठ टेकवावी,
उद्याच्या बैठकीची लगोलग आठवण करून द्यावी,
आपल्याच मनाची आपल्याच बरोबर सभा भरवावी.
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
अप्रतिम रचना 👌
ReplyDeleteखूपच छान मनोगत आहे
सभा आपलीच.👍
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा...✍️