मन असच असतं उंच उंच उडणाऱ्या पतंगासारखं ,
त्याला भानच नसतं दोराच्या दुसर्या टोकाला असलेल्या कुणाच्या तरी हाताचं.
मन असच असतं हे हवं ते हवंच्या नादात आपल्या माणसाला विसरणारं,
अन ती माणसं हरवली की मगच त्यांची किम्मत जाणणारं.
मन असच असतं स्वतः ला कुणाचा तरी मित्र मानणारं,
पण समोरच्याच्या मनात आपण किती आहो हे न जाणणारं.
भ्रमाचा भोपळा फुटला की स्वतः च रक्तबंबाळ होणारं,
कुणी तरी हात दिला की पुन्हा फुलारून येणारं.
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
No comments:
Post a Comment