आमचा एक मस्त ग्रुप आहे. लिखाण आणि वाचन करणार्यांचा. अगदी ६४ वर्षापासुन ते लग्नाळु वयाच्या मुलामुलींचा ग्रुप.
वयाची तफावत आम्हाला जाणवतच नाही कारण इथे प्रत्येकाच्या विचारांची योग्य दखल घेतल्या जाते. भांडण आणि वाद इथे वर्ज्य आहे. त्यामुळेच आम्ही एकमेकांना प्रेमाच्या धाग्याने घट्ट धरून आहोत . असो. तर आमचा हा ग्रुप आज मस्त फिरायला आला आहे . रोजच्या कामाच्या धबडग्यात सगळेच पिचले होते . म्हणून आम्ही सर्वानी मिळून ठरवले की कुठे तरी शांत शांत ठिकाणी दोन दिवस जाऊ या . म्हणून भंडारा जिल्ह्यातील अंभोरा ह्या गावी आम्ही आलो आहोत .
शांत चांदण्यांची रात्र आहे. समोर वैनगंगा आपल्या गतीने वाहते आहे. तिच्या पाण्याच्या खळखळाटाचा आवाज नीरव शांततेत अजूनच कर्णमधुर वाटतो आहे. सगळेच भारावलेले. निसर्गाच्या मनोहर रुपात रमलेले.
अशावेळी गप्पांचा विषय वळला gender equality कडे . ज्ञानु खूप creative आहे. सतत डोक्यात नव नवीन विचार, संकल्पना आणि त्यावर अंमलबजावणी करण्याची तिची धडपड वाखाणण्याजोगी आहे. म्हणूनच आमच्या ग्रुपची ती लाडोबा नंबर वन आहे .
ज्ञानु एकदम सरसावून बसली आणि म्हणाली :By all your respect दादा.....एक प्रश्न विचारते .... scientifically कोण prove करेल स्त्री ही सहनशक्ती चे दुसरे रूप आहे ???
तिची आणि पुरुषांची भावनिक, मानसिक, सामजिक सर्वच गरजा सारख्या....काही शारीरिक फरक सोडले त तर.....हे जे पुरातन काळापासून बिंबवल्या जाते ना ते बंद व्हायला हवे आधी....
We are not the superior.... We are just human being....Just a human being...
प्रत्येकाने आपल्या मुलीचे संगोपन करतांना हे सांगा तिला....तुझी आणि तुझ्या भावाची, तुझ्या नवऱ्याची इच्छा ,जिद्द, जगण्याचा अधिकार,कर्तव्य आणि सहनशक्ती सर्वच समान आहेत म्हणून.....
माफ करा दादा...तुम्हाला क्रॉस करत नाहीये....
Gender equality साठी धडपडणारी व्यक्ती म्हणून बोलत आहे.
सर्वच जण तिचे विचार शांतपणे समजून घेत होते.
मोहनदा चा विचार जरा वेगळा होता.बाई मध्ये सहनशक्ती जास्त असते असे त्यांचे मत होते .
मी तिला म्हणाले ...I fully support you . पण समाजमन बदलणे जवळपास अशक्य वाटते. मला वाटत अजून ५ -१० पिढ्या खपल्या की घडले तर घडेल. कदाचित आपण founder members असू.
मोहनदा: मी प्रुव्ह करु शकतो, लवकरच एक लेख सादर करिल, स्त्री सहनशक्तीचे दुसरे रुप आहे
ज्ञाना : नक्की दादा...फक्त ते scientifically हवं....
जुने दाखले किंवा उदाहरणे नकोत......कारण ते या समाजाचे प्रतिनिधित्व करते....आजवर चालत आलेल्या परंपरांचे प्रतिबिंब दाखविते...
आम्ही त्या समाजाविषयी बोलतोय जो घडावा हा मानस आहे.
सीतेच्या गोष्टी सांगून सांगून आमच्याकडून नकळत अग्नीपरिक्षेची अपेक्षा केली जाते...
मोहन दा : आजची स्त्री आधुनिक जरी असली तरी, तिच्या वॄत्तीत असा फारसा बदल झाला नाही, अग्नीपरिक्षा देणाऱ्या काही स्त्रिया आहे काही नाही आहे. आणि सगळ्याच स्त्रिया सहनशक्तीवाल्या नाही, काही अरेरावित गेल्या ( अरेरावी हा शब्द इथल्या स्त्रियांसाठी नाही, समाजातील काही स्त्रियांशी निगडित आहे)काही सहनशक्ती म्हणजेच सहणार्या आहेत.
Dnyanu : याला तिची सहनशक्ती नाही दादा जबाबदारी म्हणतात.....ती कितपत सहन करू शकते हे विचारण्याची तसदी समाजाने घेतलीच केव्हा???..तिच्या सहनशक्तीच्या मर्यादा परस्पर ठरवून मोकळा झाला. तुमचंच वाक्य..
"सगळ्यात स्त्रिया सहन शक्तिवाल्या नाही, काही अरेरावित गेल्या..."
ही च भीती!!!!....मी सहन केले नाही तर मुजोर ठरेल....तिला सर्वच सहन करायला लावते.
सहन करत जाणे....आणि अरेरावी करणे.....या दोघांच्या मध्ये तिसरी जागाच नाही का?
मोहन दा: तसे नाही ताई, आज समाज बदललेला आहे प्रत्येक ठिकाणी असे नाही आहे, स्त्रीकडे पूर्वी पासून त्याच नजरेने पाहिले जाते की, ती घरचा स्वयंपाक, झाडुपोछा, घरचे सगळे काम फक्त स्त्रीनेच करावे,मुलाबाळाला तिनेच पहावे
ज्ञाना : फक्त घरातील कामाची जबाबदारी इतकाच विचार नाही स्त्री पुरुष समता मध्ये... बाईच्या गोष्टी चुली पासून सुरू होतात...आणि चुलीवर येऊन थांबतात.
निशा : प्रत्येक गोष्टीचे बरेच पैलू असतात आणि प्रत्येकच मुद्द्यावर प्रत्येकाचे विचार सारखे असतील असे नाही.. प्रत्येकाने आखो देखे दाखलेही दिलेले आहेत.. तरीही मला "तुच तुझी कट्टर शत्रू" हा मुद्दा योग्य वाटतो..
ज्ञाना: *डिस्कशन शेवटी कोणत्या टॉपिक वर येऊन थांबेल सांगू.....स्त्री आणि पुरुष दोघेही शेवटी एकमेकांशिवाय अपुरे आहे.....एकमेकांना परिपूर्ण करतात...वैगेरे..."*
मला नेमके तेच म्हणायचे आहे ..स्त्री पुरुष एकमेकास पूरक आहेत ना..काही फरकासह(यात शारीरिक म्हणायचे आहे मला) त्यांची निर्मिती झाली आहे ....बस संपला विषय.....त्यात मध्येच मग स्त्री ला आदिशक्ती,सहनशक्ती....वैगेरे विशेषणे का लावता??*
वर्षा : ज्ञाना ताई च्या मताशी मी सहमत आहे .समानता हि फक्त पुस्तकात अन फार कमी लोकांमध्ये आहे .मंजूताईने पण बरोबर म्हणजे खरंच सांगितलं आहे .समाजाकडून अपेक्षा करूच नये हे माझं मत आहे .आपण समानतेची सुरवात स्वतःपासून करू शकतो .कारण समाज म्हणजे त्यात आपणही आहोतच .
चर्चा खूप जोमात चालू होती. वेळेचे भान कोणालाच नव्हते . प्रत्येकचजण हिरीरीने आपापली मते मांडत होता पण त्यात दुसर्याला खाली खेचायची भावना अजिबात नव्हती. रात्रीचा जवळपास दुसरा प्रहर संपत आला होता. ज्येष्ठत्वाच्या नात्याने आवर घालायला हवाच होता.
लगेचच सगळ्यांना थांबायची विनंती केली आणि प्रत्येकच जण निद्रादेवीच्या अधीन झाला.
........... क्रमशः
माझ्या तमाम वाचकांनो तुमचा प्रतिसाद अपेक्षित आहे . वाट पाहते आहे
ताई खूप छान चर्चा आणि विषयाची मांडणी देखील सुंदर
ReplyDeleteखूपच छान चर्चा ✍️👌👌👌
ReplyDelete