(मुक्तछंद)
कलाकार मी त्याच्या रंगमंचावरचा ,
वेळेची किल्ली भरून पाठवलेला ,
किल्ली संपेस्तोवर नाचणारा,
कुणाला हसवणारा, कुणाला रडवणारा .
तीन अंकी नाटकाचा नायक ही मीच ,
खलनायक ही मीच,
नायक खलनायकाची लढाई लढणारा,
कुणाला हसवणारा, कुणाला रडवणारा.
पहिल्या अंकाची सुरवात होते माझ्या रडण्याने,
आणि हर्षभरीत प्रेक्षकांच्या आनंदाने.
अंक संपता संपता आनंदाची जागा चिंतेने व्यापायला लावणारा,
कुणाला हसवणारा, कुणाला रडवणारा.
पहिल्या अंकाचा शेवट असेल सुखद, तर दुसरा अंक असतो मस्त ,
आशा आकांक्षा, इच्छा पूर्तीचा.
नसेल तसा तर तरुणपणीच वार्धक्याला बोलावणारा,
कुणाला हसवणारा, कुणाला रडवणारा.
तिसरा अंक सगळ्यात मोठा , सुख दुःखाने भारलेला ,
केलेल्या सत्कृत्याचे गोड फळ देणारा, दुष्कृत्याचा जाब विचारणारा.
सुटणार्यांचे हात धरू पाहणारा, धरलेल्या हातानी सहजपणे लाथाडलेला,
येतानाही रडलेला , जातानाही रडणारा , हास्य विसरलेला,
कलाकार मी त्याच्या रंगमंचावरचा ,
वेळेची किल्ली भरून पाठवलेला.
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित.
Kavyapushpa-kavitri-aanuradha Marathi free literature's and poems love poems छान मराठी पुस्तके उत्तम मराठी छान कथा कादंबरी देखील वाचा, ई-बुक्स Marathi Books, Marathi ebook epustak ई-साहित्य .
Tuesday, 6 September 2022
कलाकार मी त्याच्या रंगमंचावरचा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Welcome
संस्कारित नारायणी : सौ. ललिताशास्त्री विनायकशास्त्री आर्वीकर
ती माणसच निराळी असतात , पूर असतो त्यांच्या स्वभावात, किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात , कोसळतात खोल तेंव्हा किती उंच जातात . हृदय ...
-
मागच्या भागात काय झाले ...... कामाच्या गडबडीत तो तहान, भूक , घर, बाबा, खानावळीचा डब्बा सगळेच विसरला. आठ वाजले तसे प्यून त्याच्या आजूबाजूला...
-
शंकर इंजिनियर झाला, नोकरीला लागला . नोकरी निमित्ताने त्याची वेगवेगळया गावात, शहरात बदली होत असे. आधी शिक्षणामुळे आणि आता नोकरीमुळे सतत बा...
-
नवीन बाळ घरात आले आणि घरातील वातावरण बदलले. वातावरण जरी बदलले तरी स्वभाव कसा बदलणार? फक्त त्या स्वभावाला तात्पुरती मायेची झालर जोडली गेली....
No comments:
Post a Comment