🌇 कातरवेळ 🌇
ती कातर वेळा अजुनी स्मरते मजला ,
तो रवी क्षितिजा स्पर्शित झाला होता .
तो चंद्र हासरा नभात विहरत होता ,
दिवा तमाचा खेळ मनोहर ,
हृदया रमवित होता .
ती कातर .....
दर्याची ती गाज साथीला ,
खगे शोधीती आश्रय तरुचा,
पशू धन ते परते घरला.
भासे मजला कृष्ण सावळा ,
मुरली घुमवत आला ,
ती कातर......
अशा समयी त्या दृष्य आगळे ,
पाहून मी ही स्तंभित झाले.
बाल मूर्ती ती कटि घेऊनी ,
ममतामयी ती त्यास जोजवी.
तेज तिच्या त्या मुख कमलाचे
रवी शशीला हरवित होते .
ती कातर ...
©® सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦
🌇 कातरवेळ - २ 🌇
कातरवेळी का गे सजणी ,
भरले तुझिया नयनी पाणी .
अस्ताला तो रवी चालला ,
चल गे सखये आता गृहाला.
कपिला आणिक तिचे पाडसे ,
हंबरून तुज साद घालते,
पिंजर्या मधूनी राघू - मैना ,
तुझ्या विना गे त्यांची दैना .
उदीत होईल शशी गे आता ,
शांत सागरी उठतील लाटा ,
दुडदुडणारी सान पाऊले,
आसुसलेली तव मायेला.
सखे साजणी सावर आता,
हुरहूर लावी कातरवेळा,
तव प्रेमाची मागत भिक्षा,
अलख् निरंजन जोगी आला.
©️®️ सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦
🐥 गान कोकिळा 🐥
आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ
हात तुझा हाती ,बेभान झालेले मन ,
कागदी होडीत बसूनच फिरून आलोत सारे जग .
जग ही आपले न्यारेच, नव्हते ह्या जगा परी,
नव्हता स्वार्थ तिथे, नव्हती चिंता उद्याची.
नव्हते कोणते दुःख, नव्हती कोणती विराणी,
शब्द ,शब्द आणि शब्दच, साथीला तुझी वाणी.
आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ .
क्षणात घालत होतो आभाळाला गवसणी,
क्षणात डुंबत होतो दर्याच्या खोल तळी.
चांदणे आणि रत्ने मिरवीत होतो सारख्याच भावनेने,
वृक्षांच्या त्या हळव्या सावल्या , तृप्त कोकिळेच्या कूजनाने.
आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ .
आजही रमतेय त्याच शब्दांच्या जगात, फिरवून आणतात ते मला क्षणात तिन्ही लोकात ,
अजूनही तरंगते तीच कागदी बोट मनात, घेऊन जाते ती मला त्याच हिरव्या बनात ,
कोकिळेचे कूजन ही अगदी तसेच आहे , चेहरा मात्र तिचा स्वर्गात गेला आहे .
आठवतोय का तुला तो पावसाळी दिवस
गच्च भरलेले आभाळ अन् पाण्यात भिजलेली हिरवळ .
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पयोधी तो शांत होता..
रात्र ती नि:शब्द होती ,
द्वितीयेच्या चंद्रमाची.
भारलेल्या तारका त्या ,
पयोधी तो शांत होता.
दूर त्या दुसर्या किनारी ,
आर्तता खुणवीत होती,
वेणूच्या त्या आर्त नादी ,
मी स्वतःला शोधीत होती .
कोण मी ? कोण मी ?
सागरा तू सांग रे,
ऐकुनी प्रश्नास माझ्या ,
तू कसा शांत रे ?
हारले एकदा मी पुन्हा रे,
शोधता मज त्या किनारी,
हरवले मी पुन्हा रे,
शांतशा त्या सागरी .
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧
प्रतिभेला प्रतिभेची
जाणीव असावी
सोन्याच्या कोंदणाने
हिरकणी अलगद उचलून घ्यावी
©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित
🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️🟣🔷️
भास आभासाचा हिंदोळा ,
खुणावतो तो आजही मजला .
येशील कारे सखया कृष्णा ,
वाट पाहते वेडी राधा .
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩🟧🟩
चंद्र सावळ्या नभी उगवला
पवन शीतल मंद भासला
वनी केवडा फुलून आला
बंसीतून तो कृष्ण ही वदला
वृथा सारे सखये तुज वीण
का फिरते तू होऊन विरहीण
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻🔺️🔻
सहस्र रश्मी पसरून जगभर
जीवन देई तो धरणी वर
नसे दुजा त्या रवी राजा सम
नसे विसावा त्याला क्षणभर
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅
WOW
ReplyDeleteखूपच छान सर्व कविता👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏
सर्वच कविता खूप खूप सुंदर 👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर👌👌
ReplyDeleteखुप सुंदर कविता नाई
ReplyDeleteत्रिवार वंदन माझे सखये. खूप सुंदर. 👌👌👌👌
ReplyDeleteखूप सुरेख 👌🏻👌🏻
ReplyDeleteKhoop Surekh 👌👌
ReplyDeleteअप्रतिम कविता ताई
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteअप्रतिम👌👌👌👏👏
ReplyDeleteसौ.सोनाली उपगडे
ReplyDeleteसर्वच रचना अप्रतिम आहे 👌👌👌
ReplyDelete