|| श्री गणेशाय नमः||
१.
निश्चय
जग मला हरवायला निघालयं,
ऐकून मी हादरलेच होते.
कारण माझ्या जगात सारे
आप्त माझे भरले होते.👨🎤👩🎤🧑🚀🕵♀️👮
भगवत् गीता मला आठवली
"सीदन्ती मम गात्राणिʼʼ चा
अनुभव मला देऊन गेली .
युग पुरुषाचा संदेश
कृतनिश्चय म्हणत म्हणत
भरला मी माझ्यात आवेश
ह्या क्षणी दोस्तहो
मी फार खुशीत आहे
ह्या जगाशी ,नव्हे ह्या आप्तांशी
लढण्यासाठी दंड मी थोपटले आहे.
ह्या युद्धात जिंकले तर
राणी तुमची बनून येईन
दुर्दैवाने संपले तर
आठवणी माझ्या देऊन जाईन.
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
पुन्हा एकदा ती वेळ यावी🕧🕐🕜
पुन्हा एकदा ती वेळ यावी ,
मोठेपणाची गुर्मी सरावी.
बालपणीच्या त्या काळात जावे,
सख्यांसवे मग तेथे रमावे.🤼♂️🚴🤸🤾
झुला झुलावे , लपुनी बसावे,
त्या मातेच्या कुशी शिरावे.
बाबांसवे फिर फिरूनी यावे,
हवे तसे मग हुंदडावे .
देशील देवा पुन्हा एक संधी,
शाळे मध्ये त्या पुन्हा जावयाची.🏢🧱
रांगे मध्ये त्या उभी राहण्याची.
मित्रां सवे त्या पुन्हा खेळण्याची .
-----
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
३.
कृष्ण शोध
नि:स्तब्ध मी, नि:शब्द मी
शब्दातल्या "अर्थात" मी .
दृश्यातला अदृश्य मी ,🌈
पिंडातला ब्रह्मांड मी.
रेणूहूनी अति सूक्ष्म मी,
मोठा तरी विश्वाहूनी.
वृक्षात मी , बीजात मी ,
हृदयी तुझ्या वस्तीस मी.
गात्रात मी , स्पर्शात मी
प्राणात मी , जीवात मी.
श्वासात मी, उश्वास मी,
शोधी मला पवनातही .
स्वरात मी, लयीत मी,
गीतात मी, तानेत मी.
सप्त स्वरांचा साज लेवुनी
शोधी मला मुरलीत ही.
राधेत मी , मीरेत मी ,
गोप गोपीच्या स्नेहात मी .
द्वेषात मी , प्रेमात मी ,
भक्त मनातील कृष्ण मी.
-----
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
४.
कैफ त्या माझ्या स्वरांचा
गंधाळलेल्या त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या ,
रात्र आहे संपलेली, स्वागता तुम्ही सिद्ध व्हा.
शब्द माझा मी दिलेला ,ठेवूनी साक्षी शशिला
कालच्या त्या सार्या व्यथांना, तुम्ही पुन्हा प्रसवू नका .
तळपेन मी फिरूनी पुन्हा , सूर्या सवे नभ अंतरी
बरसेन मी धरती वरी , चपलेस ही हरवेन मी
तुम्ही परी गाऊ नका , कालची ती भैरवी ,
गंधाळलेल्या त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या
ठिणगी ही मी , स्फुलिंग मी ,ज्वाला कधीही होईन मी .
जाळेन ह्या सार्या जगाला , विसरू कधी ना देईन मी ,
तुम्ही परी या साथ द्याया , जगण्यास या आतुरले मी
गंधाळलेल्या त्या स्वरांनों, या तुम्ही परतून या
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
🌲तुला मी विसरणार नाही,
वाटेवरच्या त्या वळणावर,
जरी मी तुला दिसणार नाही.🌲
विसरलास तू सारे
कळले जेंव्हा मजला ,
लाटांच्या त्या हिंदोळ्यानी
दूर किनारा केला .
काठावरचे सूर तुझे ते
मजला खुणवित होते ,
नयना मधले आसू सारे
मागे खेचित होते.
कणा कणा ने बुडता बुडता
तुजला निरखीत होते,
तिमीरात ही अंध दिशांना
तुलाच शोधत होते.
का रुसलासी
नव्हते मजला कळले,
विना गुन्ह्याचे नको
मला रे पहारे वेदनांचे.
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
-----
७.
शिदोरी
मी,माझे,माझ्यासाठी
तुझे, आपले आपल्यासाठी,
खूप सारे जगून झाले,
परतीच्या ह्या वाटेवरती
एकटेपण मला छळून गेले.
सुखाच्या सरींनी मी
मोर बनून नाचले,
दुःखाच्या क्षणी मी
तळमळून रडले,
परतीच्या ह्या वाटेवरती
मलाच मी हरवले.
हा माझा, तो परका,
मी मोठा , तू छोटा .
हा उजवा, तो डावा,
खेळ होता मनाचा सारा.
परतीच्या ह्या वाटेवरती
गोंधळ सारा तसाच राहिला.
भूतकाळातील घटनांसाठी,
भविष्यातील स्वप्नांसाठी,
वर्तमानाशी जुळवते आहे.
मागची वाट खुंटलेली,
पुढली सारी अंधारलेली,
परतीच्या ह्या वाटेवरती,
तिथेच मी थबकलेली,
तिथेच मी थबकलेली...
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
-----
९.
सखये तुझ्याविना अधुरा मी..
सांग सखये काय गुन्हा केला ,
सर्व संगे संसार त्याग केला
दिली होती आण मीच मज गे
जपीन तुजला प्राण प्रतिष्ठेने
काय सांगू त्या वृद्ध माय ताता ,
काय कथु त्या भगिनीं आणि भावा
कशी निर्लेप अशी तू झाली
दोघी तनया विकल अति होती.
करोना तो काळ बनूनी आला
स्वये संगे तुज घेऊनी पळाला
बहुत विनये प्रार्थिले तयाला
तरी दुष्टा ने घात मला केला.
कसा राहू ह्या थोर महाली गे
तुझ्या विना हे भगभगीत सारे.
वृथा वाटे पदवी वैद्यकीची
नसे आता लालसा धनाची.
सांज समयी एकलाच मी गे
आठवानी तुज सी आळवी गे.
पुनः जन्मा येशील कधी तू गे?
पुन्हा मजला भेटशील का गे ?
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
-----
१०
अनोळखी पाऊलवाट
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर जाहलो ,
चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .
शब्द सारे ,अर्थ सारे , खिन्नता लेऊन आले
पौर्णिमेच्या चांदराती , मन असे काजाळले,
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर जाहलो..
चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .
तार ही छेडियली , सूरही झंकारले,
का ? कसे ? ते गीत माझे साज नाही ल्यायले,
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर जाहलो...
चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .
आरतीला दीप होता,भावनांचा गंध होता ,
गीत माझ्या आवडीचे, ईश्वराने त्यागीले,
मीच माझ्या मैफिलीचा बेसूरा सूर जाहलो
चांदणे शापित ज्याचे त्या घराचा चंद्र झालो .
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
-----
१२.
Mother's Call
I am there for her till my death.
I know she is strong enough,
physically as well as mentally.
She is brave, but will be lonly fighter, after my death.
Will you be there for her as a big support?
I promise you, she won't interfere in your family life,
I promise you, she won't depend on you for money ,
But sometimes she will be needing someone To talk to,
Will you be there for her as a good friend?
Sometimes in future she may get confused,
Or may not be able to find the correct way out,
Will you be there for her as a best guide ?
A mother is very panic for her,
When she thought about her future,
A mother gave her everything possible,
But was not able to give her a brother,
Will you be there for her as a big brother, after my death?
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
-----
१३.
प्रिय भगिनीस
This comment has been removed by the author.
ReplyDeleteसर्व रचना छानच 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏
Deleteअप्रतिम ताई
Deleteखुप सुंदर आहेत सर्वच रचना, सुरेख शब्दांकन , सुंदर लेखनशैली...👏👏👏
ReplyDeleteखूप सुंदर लिखाण केले आहेत मंजुषा ताई 👍👍
ReplyDeleteKhup Chan kavitanch likhan tai
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुप खुप छान कविता आहेत मनीषा ताई.
ReplyDeleteवाह, आज एकदम कवितांची मेजवानीच मिळाली👌👌
ReplyDeleteछान रचना.. गजल तर फारच सुंदर
Thanks ऊर्मी
Deleteसर्वच रचना खुपच सुंदर आहेत 👌👌👌💐💐💐
ReplyDeleteखुप छान कविता
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम
ReplyDeleteKhuppach chhan. I was not aware of your this quality.congradulations.
ReplyDeleteThanks.who?
Deleteमंजू....काय सुरेख रचना आहेत ग....
ReplyDeleteकृष्णशोध तर अप्रतिम
धन्यवाद dnyanu
ReplyDeleteअप्रतिम आहे. सर्व रचना.
ReplyDeleteहा blog वेगळा दिसत आहे
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDeleteअतिशय सुंदर सर्वच रचना 👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम..
ReplyDeleteसर्वच रचना एकदम सुंदर आहेत
ReplyDeleteWow .. मस्त आहेत एकदम
ReplyDeleteखूपच छान ....अप्रतिम
ReplyDeleteखूपच छान रचना ताई सर्वच ..👌👍✍️🍫
ReplyDeleteअप्रतिम ...फारच सुरेख
ReplyDelete---- कांचन टेम्भेकर
थँक्स कांचन
DeleteKhup chhan Kavita kelya Manjusha Vaihini! Surekh!
ReplyDeleteApratim surekh Manjusha Vaihini!
ReplyDeleteथँक्स
DeleteHello..!
ReplyDeleteछान रचना केली आहे..!
आबा
🙏
अप्रतिम👌👌 ताई
ReplyDelete