उंच गगनी विमानातूनी,✈️
फिरता बघते मी धरणी.🌏
दिसे तिथे ते घर कौलारू, 🛖
कपिला आणिक तिचे वासरू .🐄
असे तिथे तो श्वान सख्या हो,🐕
तृप्त मनी तो हुंदडतो.
बाजूला ते शेत डुले हो,🌴🌲🌳🍀
वृक्ष, लता अन् फळे, फुले हो .🍎🍏🍅🍈🥬🥒🍑
दृश्य अचानक दिसे वेगळे,
भासे मज ते जरा आगळे.
उभे तिथे तो वृद्ध एकला,🧙♂️
निरखूनी बघतो गगनाला. ☁️⛅️🌤
हालवून अपुल्या दोन्ही करांना,👋🖐👋🖐
भासे मज तो साद घालतो.
सय येई मज मग आजोबांची, 🗣
अन् दूर देशीच्या मम गावाची.
सय येई मज काकांची अन काकूंची, 👨❤️💋👨
भावांची अन भगिनींची. 👨👦👩👦
उभी माय ती गेही एकली, 🧍♀️
वाट बघे ती आसुसूनी.
दृष्य रम्य ते धूसर झाले 💧💧💧
बघता बघता क्षणात एके.
पुसूनी लोचने येता भानी,
दिसले मज मी अजूनी गगनी.
©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
💦💦💦💦💦💦💦💦💦
खूपच छान 👌
ReplyDeleteआबा...✍️